लग्नाचा चोर बाजार
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे.कारण या टप्प्यावर माणसाचं संपुर वैवाहिक जीवन अवलंबून असते त्यामुळे लग्न करताना दोन्हीकडचे लोक वधुवरांची सर्व पार्श्वभूी पाहूनच पुढे पाय टाकतात.आणि गेले वर्षणवर्ष हीच पद्धत आहे .यातील देण्याघेण्याच्या व्यवहारिक बाबी म्हणजे हुंडा वैगेरे सारखे प्रकार सोडल्यास लग्न जुळवण्याची ही पद्धत योग्यच आहे.पण आजकाल मोठ्या प्रमाणावर प्रेमविवाह होत असल्याने ही पद्धत काहीशी मागे पडत चालली आहे.शिवाय लिव्ह इन रिलेशनशिप ने समाजातील सभ्यता आणि परंपरेला च डांबर फासले आहे .मात्र तरीही विवाह आणि विवाह संस्था यांचे अस्तित्व टिकून आहे .आणि ते टिकून रहायलाच हवे .पण दुर्दैवाने विवाह संस्थांमध्ये काही भामट्यांनी शिरकाव केलाय आणि अशा लोकांकडून बोगस विवाह संस्था तयार केल्या जात आहेत या बोगस विवाह संस्थांच्या माध्यमातून विवाह इच्छुक वाढू वरांची फसवणूक तर काही ठिकाणी उपवर मुलींचे लैंगिक शोषणही केले जात आहे.आणि असे करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय आहेत या टोळ्यांमध्ये सुंदर मुलींचाही समावेश आहे.लग्नाची जाहिरात द्यायची त्यातून एखादे श्रीमंत स्थळ हेरायचे त्या वराशी मुलीचे लग्न लावायचे आणि नंतर एक दोन दिवसातच त्या नव विवाहितेने पैसे व दागिने घेऊन पोबारा करायचा असे प्रकार सुरू आहेत.केवळ हाच प्रकार नाही तर इतरही प्रकार आहेत.एखाद्या विवाह इच्छुक तरुणाने विवाह संस्थेशी संपर्क साधल्यास त्याला सुंदर मुलींचे फोटो दाखवले जातात मात्र त्याने बोलणी करण्यासाठी त्या मुलीचा किंवा तिच्या पालकांचा नंबर मागितल्यास त्याला अगोदर 2 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक रक्कम भरून नोंदणी करायला लावायची आणि नंतर इतर स्थळे दाखवण्यास टाळाटाळ करायची असेही प्रकार घडत आहेत त्यामुळे लग्नाच्या या बाजाराचा आता चोर बाजार झालाय आणि या चोर बाजारात पाय ठेवणाऱ्या इच्छुकांचे खिसे कापले जात आहेत तेंव्हा हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा
लग्न ही एक पवित्र अशी सामाजिक प्रक्रिया आहे तिची विश्वसनीयता टिकून राहायला हवी पण आजकाल लग्नाच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत कारण पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाने विवाहसंस्था उगवल्या आहेत हा बींन भांडवली धंदा असल्याने थोडीशी बोलबच्चन करण्याची कला आणि फसवणुकीचा अनुभव असलेले अनेक लखोबा लोखंडे या लग्नाच्या बाजारात सक्रिय आहेत.काही ठिकाणी तर विवाह संस्थांच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जाते मुली पुरवल्या जातात तर काही ठिकाणी मुली पुरवणारे दलालच विवाह इच्छुक वर बनून येतात खोट्या माहितीचा bayodeta देतात विवाह संस्थांमध्ये त्यांची सेटिंग असल्याने त्यांना चांगल्या आणि श्रीमत घराण्यातल्या मुली दाखवल्या जातात त्यानंतर ते नावाला त्या मुलीशी लग्न करतात काही दिवस तिला स्वतः वापरतात आणि नंतर तिचा सौदा करतात हा प्रकार अत्यंत भयानक आहे अशा पद्धतीने अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत.अर्थात सगळ्याच विवाह संस्था तशा नाहीत .बहुसंख्य विवाह संस्था या प्रामाणिक आणि विश्वसनीय आहेत त्यांनी अनेक तरुण तरुणींचं लग्न जुळवून त्यांच्या आयुष्याचं भल केलय पण या व्यवसायात काही लबाड लोक शिरलेले असल्याने चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विवाह संस्थांच्या विश्वास अहेतेला कुठे तरी तडा जातोय म्हणूनच विवाह संस्थांची नोंदणी करताना त्या संस्थेच्या प्रमुखाची पार्श्भूमी तपासूनच नोंदणी करावी जेणेकरून विवाह इच्छुक वाढू वारांची फसवणूक होणार नाही .