ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार 23 जणांना अटक-गँगरेप ने डोबिवली हादरली


डोंबिवली – सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पूर्वेत असणाऱ्या भोपर गाव या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी दुपारपर्यंत पोलिसांनी २१ जणांना अटक केली असून त्यात दोन अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी २९ जणांविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलीग, पोस्को आणि आयटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्व भोपर परिसरात पीडित मुलगी ही कुटुंबियांसह राहण्यास आहे. या पीडित मुलीचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. जानेवारी महिण्यात या तरुणाने पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार करून बलात्काराचा व्हिडीओ मोबाईल फोन मध्ये तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ मित्रांना पाठवला, त्याच्या मित्रांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पीडित मुलीला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिण्यात २९ जणांनी पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला असून त्यात काही जणांनी वारंवार तिच्यावर अत्याचार केला आहे. तिच्यावर सतत होणाऱ्या या प्रकारामुळे पीडित मुलीच्या प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर तीने हा प्रकार आईला सांगितला. हा प्रकार ऐकून पीडित मुलीचे कुटूंब हादरले व त्यांनी बुधवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून २९ जणांविरुद्ध बलात्कार, पोक्सो, ब्लॅकमेलिंग, आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात असून रात्रीपासून आरोपीची धरपकड सुरू करून २१ जणांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या ९ आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

error: Content is protected !!