ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले

दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ ए या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या देशभरातील सर्व कार्यालयांवर काल एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले आणि या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 108 जणांना अटक केली आहे .या छापेमारिमुळे देशातील कट्टरपंथी मुस्लिम हादरून गेले आहेत .
पी आय एफ या कट्टरपंथी संघटनेवर टेरर फडींग,मुस्लिम तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देणे,शिबिरे आयोजित करून त्यात भडकाऊ भाषणे देऊन मुस्लिम तरुणांची माथी भडकवणे , बंदी घातलेल्या संघटनांमध्ये जाण्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रेरित करणे, बेकायदेशररित्या जमाव जमवून हिंसक कारवायांना प्रोत्सान देणे यासारखे गंभीर आरोप आहेत . 18 सप्टेंबरला एन आय ए चां 23 पथकांनी आंध्र आणि तेलंगणातील या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती . यात गुंटूर,निझाम बाद, कुरणुल नेल्लोर आदी जिल्ह्यातून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर काल एन आय ए ने एकच वेळी महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल,दिल्ली तामिळनाडू,कर्नाटक आदी 10 राज्यांमधे छापेमारी केली आणि या संघटनेच्या 108 कार्यकर्त्यांना अटक केली यात या संघटनेचा अध्यक्ष ओ एम ए सलाम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे . आता त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!