लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला
मुंबई/महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जात असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दोन हप्ते मिळालेले आहेत त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिला तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांच्य बँक खात्यात 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होईल दरम्यान या योजनेचा आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि महायुती सरकारचे जाहीर आभार मानलेले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा आहे किंवा तसे झाले तर मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळू शकते त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची सरकारकडून काळजी घेतली जात आहे