ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण


हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची शुद्धता करण्याची मागणी मान्य करण्यात आली आणि त्यानंतर तिरुपती मंदिरात ओम हवन करू मंदिराची शुद्धता करण्यात आली सध्या लाडू भेसळ प्रकरणी यासाठी कडून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लाडू भेसळ आरोप हा तिरुपती देवस्थानाला बदनाम करण्याचा प्रयत्न असून चंद्राबाबू नायडू यांच्या या प्रयत्नांमुळे आंध्र मधील जनतेत तसेच तिरुपतीच्या भक्तांमध्ये संतापाची भावना आहे असे म्हटले आहे त्यामुळे या लाडू भेसळ प्रकरणाची आता देशभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे तसेच तपासात काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे

error: Content is protected !!