ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील विरोधकांना आणखी त्रास देण्याचा मार्ग मोकळा – सीबीआयला रान मोकळे

मुंबई/ सत्ताधाऱ्यांनी सध्या विरोधकांच्या मागे ई डी ची सीडी लावली आहे .पण ती कमी पडली म्हणून की काय आता सीबीआयला सुधा राज्यात रान मोकळे करून देण्यात आले आहे. त्यामुळे ई डी आणि सीबीआयचा कचाट्यात विरोधकांचे पूर्णपणे सँडविच होणार आहे
केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मागील महा विकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार सरकारची परवानगी घेतल्याशिवाय सीबीआयला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची चौकशी करता येणार नव्हती.मात्र शिंदे फडणवीस यांचे सरकार सते मध्ये येताच त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे.त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारने सीबीआयचा बाबतीत चौकशीसाठी सीबीआयला सरकारची परवानगी घ्यावी लागेल हा जो निर्णय घेतला होता तो नव्या सरकारने रद्द केला आहे . त्यामुळे सीबीआय आता महाराष्ट्रात कधीही आणि कुणाचीही चौकशी करू शकेल सीबीआयला आता महाराष्ट्रात चौकशीच्या नावाखाली कुणालाही ताब्यात घेता येईल सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांवर आणखी एका संकटाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे .

error: Content is protected !!