वर्ल्डकपच्या थरारक सामन्यात- पाकवर भारताचा विजय – दिवाळीतील सुपर संडे
मेलबर्न / टी 20 वर्ल्ड कप स्पर्धच्या सुपर12 मधील पहिल्याच भारत / पाक यांच्यातील अखेरच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला त्यामुळे एन दिवाळीत भारतीयांनी मेलबर्न स्टेडियमवर आणि देशभर दिवाळी साजरी केली
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवीत, पाकच्या सलामीच्या स्टार फलंदाजांना अवघ्या ५ धावात तंबूचा रास्ता दाखवला.त्यावेळेसही हर्षदीप पाकिस्तानी फलंदाजांची कर्दनकाळ ठरला . त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला खतेही खोलू दिले नाही. तर सध्या जबरदस्त फार्मात असलेल्या मोहम्मद रिझवान याला ४ धावांवर बाद केले . दोन स्टार फलंदाज झटपट बाद झाल्याने पाकिस्तनच्या तंबूत खळबळ माजली . त्यानंतर सलीम मसूद आणि निफ्टीकर अहमद या दोघांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके झळकावली पण शमीने निफ्टीकरला ५१ धावांवर बाद केल्यांनतर पाकिस्तानची पुन्हा घसरगुंडी उडाली . हार्दिक पंड्याने पाकिस्तानची मंडळी फळी कापून काढली . शाबाद खान याला ३ धावांवर हार्दिकने बाद केले. तर हैदर अलीला २ धावांवर तंबूचा रास्ता दाखवला. हार्दिकच्या गोलंदाजीवर या दोघांचेही सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतले. त्यानंतर हार्दिकने नावाजला ९ धावांवर कार्तिकच्या हाती झेल देण्यास भाग पाडले . तर आसिफ अली याला आर्षदिपने २ धावांवर बाद केले.मात्र मसूद एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याला डेथ ओव्हर मध्ये शाहीन आफ्रिदीने चांगली साथ देत १६ धावा केल्या. तर मसूद ५२ धावांवर नाबाद राहिला. आणि अशातर्हेने पाकिस्तानने १९ .२ षटकात १५८ धावांवर आटोपला . आणि भारतासमोर विजयासाठी १५९ धावांचे टार्गेट ठेवले
दरम्यान भारताचीही सुरुवात खराब झाली . अवघ्या १० धावांवर सलामीवीर के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा बाद झाले. रोहितला रौफने ४ धावांवर झेलबाद केले तर के एल राहुल याचा ४ धावांवर नसीम शहाने त्रिफळा उडवला
त्यानंतर सूर्यकुमार यादव 10 धावांवर तर अक्षर पटेल 2 धावांवर बाद झाला पण हार्दिक आणि विराटची जोडी जमली या दोघांनी शतकी भागीदारी करून भारताला विजयाच्या समीप आणले पण हार्दिक शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर कार्तिक बाद झाला पण गोलंदाज नवाझने 1 व्हाईट आणि1 नोबोल टाकून भारताच्या विजयला हातभार लावला आणि भारताने सामना जिंकला विराटने नाबाद 82 धावा केल्या ..