कॅगचे अधिकारी पालिकेत पोचले
12 हजार कोटींच्या झोलचा पर्दाफाश होणार
2019 ते 2022 या काळात पालिकेच्या 10 वेगवेगळ्या विभागात 12 हजार 23 कोटी 88 लाखांची कामे झाली होती . यातील बहुतेक कामे कोविड काळात झाली होती त्यात कोवीड सेंटर,दहिसर येथील भूखंड खरेदी आदी कामांचा समावेश होता .सरकारने आता या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदर्श दिले असून या कामांचे लेखा परीक्षण होणार असल्याने पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी आणि पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . दरम्यान कॅगचे अधिकारी पालिकेत पोचण्यापूर्वी आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅगला सहकार्य करा असे आदेश दिले आहेत त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना कॅगल सहकार्य करण्याशिवाय पर्याय नाही .