ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेची भुल कंत्राटी डॉक्टरांसाठी एक कोटीची वेगळी चूल


मुंबई/ आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत देशात वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी आणि पालिका अधिकारी यांना चरण्यासाठी वेग वेगळी कुरणे कशी निर्माण केली जातात हे मुंबईकर जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग आणि त्या अंतर्गत येणारी रुग्णालये ही खरतर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहेत पण त्यांनाही कशा प्रकारे चराऊ कुरणे बनवण्यात आली आहेत हे अनेक घोटाळ्या मधून मुंबईकराणी पाहिले आहेे. मात्र आता आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहेे. एकत्र विलीनीकरण करण्यात आलेल्या पालिकेच्या बोरिवली मधील भगवती आणि कांदिवली मधील शताब्दी रुग्णालयात भूलतज्ञांची रिक्त पदे भरण्यात ऐवजी त्या ठिकाणी कंत्राटी भूलतज्ञ घेण्यात आले आहेत आहेत . या ८ भूलतज्ञासाठी पालिका चक्क वर्षाला एक कोटी रुपये मोजत आहे .शताब्दी मध्ये भूलतज्ज्ञची आठ पदे रिक्त असून त्यातील दोन भरलेली आहेत आणि सह रिक्त आहेत.२०१४ पासून कंत्राटी पद्धतीने भूलतज्ञ घेतले जात आहेत. त्यासाठी १६ कोटींचे टेंडर काढले होते पण कंत्राटदार म्हणाला अर्धेच बस यावरून यात काय भानगडी आहेत ते स्पष्ट दिसते अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .मुंबईतील के ई एम, नायर, राजावाडी शताब्दी यासारख्या पालिका रुग्णालयात रोज छोट्या मोठ्या अनेक शस्त्रक्रिया होत असतात त्यात हृदय,मेंदू,यकृत यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियेने समावेश आहे असे असताना पालिका रुग्णालयासाठी पुरेसे भूलतज्ञ नसावेत याचेच आश्चर्य वाटतेे. पालिका इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते मग पालिका रुग्णालयासाठी पुरेसे भूलतज्ञ का नाहीत? कंत्राटी भूलतज्ञावर कोट्यवधी का खर्च केले जातात असा सवाल मुंबईकर व्यक्त करीत आहेत

error: Content is protected !!