आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड
मुंबई/ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण् अंगावर आली असून याप्रकरणी जयसिंग राजपूत याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली .असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
तुम्ही सुशांतसिंग राजपूत याला मारलेत आता तुमचा नंबर आहे असा धमकीचा मॅसेज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आला होता तत्पूर्वी आरोपींनी त्यांना फोनही केले होते या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीचे लोकेशन ट्रेस करून आरोपी जयसिंग राजपूत याला बंगळुरू मधून अटक केली तो स्वतःला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा फॅन समजतो.सध्या मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत .
दरम्यान आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी आल्याचे समजताच शिवसेनेत मोठी खळबळ माजली.राज्य विधी मंडळाच्या दोन्ही सभगृहात त्याचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी अशा घटनांमध्ये सनातन चां सहभाग असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे त्यामुळे सनातन वर बंदी घालावी अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्याला विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना दोन वर्ष तुमचे सरकार आहे पुरावे असतील तर तुम्ही का नाही तसे केले असा सवाल केला तर नवाब मलिक यांनी याच प्रकरणाला धरून वानखेडेे मुद्दा उपस्थित केला .त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की अनेक आमदारांना धमक्या येत आहेत त्यामुळे आमदारांची चौकशी समिती मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची ती मागणी अमान्य करीत आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकी प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे