ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा असलेली शक्ती विधेयक विधानसभेत मंजूर


मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद असलेले शक्तीविधेयक आज राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करून घेतले त्यावर आता राज्यपालांची सही झाली की त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या नव्या कायद्या नुसार महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा ३० दिवसात तपास करणे पोलिसांना बंधनकारक आहे. तसेच महिलांवरील असिड हल्ल्याच्या प्रकरणात जन्मठेप किंवा १५वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्यास संबंधित महिलेलाही एक वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे आता महिलांवरील अत्याचाराच्या ghatnana आळा बसू शकतो

error: Content is protected !!