ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

किशोरी पेडणेकरचे गोमाता नगरातील फ्लॅट सील

मुंबई-एसआरए योजने अंतर्गत वरळीच्या गोमाता नगरीतील इमारती मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा फ्लॅट आणि कार्यालय महापालिकेने सील केले आहेत . बनावट कागदपत्रांबाबत किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून हि कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते. या योजनेवरून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. तर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतर्गत बांधलेल्या सदनिका बळकावल्याचा आरोपही भाजप नेते किरीट सोमाय्या यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील संबंधित वादग्रस्त सदनिका सील केल्या आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत माहिती दिली आहे.
महापालिकेने कारवाई केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी देखील ट्विट करत भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे त्या लिहतात की, #भाडेतत्त्वावर राहत होते, माझे कुठचेही गाळे नव्हते व कोणतेही गाळे माझे सील झालेले नाही हे माहिती असून सुद्धा श्री.किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे . गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

error: Content is protected !!