दिशा सालियन प्रकरणाची – एस आय टी चौकशी होणार
नागपूर -सुशांतसिंग राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीवरून आज विधानसभेत सत्ताधार्यांनी हंगामा केला .अखेर या प्रकरणाची एसआय टी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशनात आज जी काही गरमागरमी पाहण्यास मिळाली ती दिशा सालियनच्या प्रकरणावरून. दिशा सालियनचा मृत्यू हा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू आधी काही दिवस झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही यावरून आरोप- प्रत्यारोप झाले. या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होईल असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आपण जाणून घेणार आहोत हे प्रकरण नेमकं आहे काय?
दिशा सालियनचा मृत्यू कधी झाला? ती कोण होती?
तारीख होती ८ जून २०२० याच दिवशी दिशा सालियनचा मृत्यू तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून झाला. ही आत्महत्या असल्याची नोंद पोलिसांनी केली. दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत गंभीर आरोप केले