ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मराठी शाळा बंद करून शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे कारण मुंबईतील जागेला प्रचड भाव आहे त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर यांची अभद्र युती मुंबईत सतत जागेच्या शोधात असतात पण आता मुंबईत जागाच शिल्लक नसल्याने शैक्षणिक संस्थेसाठी, स्पोर्ट साठी,रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भुखंदांवरचे आरक्षण हटवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप मुंबईकर करीत आहेत त्यानंतर या त्रिकुटाचा आता मुंबईतील मराठी शाळांच्या जागांवर डोळा आहे त्यासाठी पटसंख्या कमी दाखवून त्या शाळा धडाधड बंद पडल्या जात आहेत. पालिकेच्या ई विभागातील तब्बल आठ मराठी शाळा पटसंख्येचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या्या्या्य. आता या शाळांच्या जागांवर काय उभे केले जाणार हे वेगळे सांगण्याची गरज नाहीत ई विभागातील ३६ अन्य भाषिक शाळा सुरू असताना मराठी शाळाच का बंद पडली जात आहेत असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत आणि येत्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला या सगळ्याचा हिशोब द्यावाच लागेल असा इशाराच मुंबईकरांनी दिला आहे

अग्रीपाडा मराठी शाळा – बंद
सोफिया झुबैर रोड मराठी शाळा – बंद
माझगाव मराठी शाळा – बंद
बापूराव जगताप मराठी शाळा – बंद
टक बंदर मराठी शाळा – बंद
चिंचपोकळी मराठी शाळा – बंद
चिंचपोकळी उर्दू शाळा शाळा – बंद
साने गुरुजी मराठी शाळा – बंद
भायखळा मराठी शाळा-चालू
आगपाडा मराठी शाळा-चालू
कामाठीपुरा मराठी शाळा-चालू
फुले मराठी शाळा-चालू
नवाब टॅंक मराठी शाळा-चालू

पूर्व मराठी शाळा-चालू
मोती शहा लेन मराठी शाळा-चालू
रामभाऊ भोगले मराठी शाळा-चालू

error: Content is protected !!