ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकले- उद्धव ठाकरेंचा जबरदस्त हल्लाबोल

पुणे – भाजपची भूमिका युज अँड थ्रोची असून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुंबाचा वापर करून फेकून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कसबा चिंचवडच्या ऑन लाईन प्रचारात भाजपवर हल्लाबोल केला
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची सुरुवात या पोटनिवडणुकीपासून करण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राज्यात मध्यवधी निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.
प्रचारात दोन्ही बाजूचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. त्यातच आज, उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेची लढाई सुरू आहे. यामध्ये आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन ही दुर्देवी घटना असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. भाजपने टिळक कुटुंबातील सदस्यांना तिकीट का नाकारली, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपने फक्त त्यांचा वापर केला. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती सध्या चांगली नाही. तरीदेखील त्यांना गंभीर अवस्थेत प्रचार करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार दु्र्देवी नाही का, असा प्रश्न त्यांनी ठाकरे यांनी केला. भाजप नेत्यांकडून असे दुर्देवी प्रकार सुरू असताना दुसरीकडे त्यांना सहानुभूती दाखवण्याची काही गरज नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले

error: Content is protected !!