तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.
अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना राम मंदिराचा मुद्दाही मांडला. इंडिया आघाडीने राम मंदिर होऊ दिलं नाही, पंतप्रधानांनी पाच वर्षात मंदिर बांधलं, असं त्यांनी म्हटलं. अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची जाहीर सभा झाली. यावेळी अमित शाह यांनी इंडिया आघाडीला लक्ष्य केलं आहे.
यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, मला शरद पवारांना काही प्रश्न विचारायचं आहे. उद्धव ठाकरे यांना मी काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मला शरद पवारांना विचारायचं आहे की, शरदराव तुम्ही १० वर्ष महाराष्ट्रातून केंद्र सरकारमध्ये होतात, कृषी मंत्रालय सांभाळत होतात. १० वर्षात सोनिया गांधी, मनमोहन सिंह सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती निधी दिला. अकोलेकरांनो, याचा हिशोब मिळाला पाहिजे की नाही, असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.
मी हा हिशोब देणार आहे. १० वर्षात युपीए सरकारने १० वर्षात 1१ लाख ९ १ हजार कोटी दिले होते. भाजप सरकारने १० वर्षात ७ लाख ९१ हजार कोटी महाराष्ट्राा दिले. २ लाख ९० हजार कोटी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, ७५ हजार कोटी रस्ते निर्माणासाठी दिले, असं अमित शाहांनी सांगितलं. महाराष्ट्राचं भलं मोदींच्या नेतृत्वात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार करतील. कमळाचं बटन एवढं रागानं आणि जोराने दाबा की करंट इटलीत लागला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.