ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

संपूर्ण टोल माफीसाठी ठाणे – मुंबईच्या वेशीवरील ५० गृहनिर्माण सोसायट्यांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

ठाणे : लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अनेक ठिकाणी काही गावांनी वा समूदायाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं आपण ऐकतोय, त्यासाठी वेगवेगळी कारणंही असतात. पण ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे मतदान करणार नसल्याचं जाहीर केलंय. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हरी ओम नगरने मतदानावर बहिष्कारटाकण्याचा इशारा दिला आहे.
हरी ओम नगर ही ठाणे शहराच्या कोपरी गावाला चिकटून वसलेली वस्ती आहे. मात्र इथे राहणारे रहिवाशी मुंबई शहरात मोडतात. त्यांचा कर भरणा देखील मुंबई महापालिकेत आहे. त्यामुळे पत्ता मुंबई असा असल्याने हरी ओम नगरपासून जवळच असलेल्या मुंबई एन्ट्री पॉइंट टोल नाक्यावर या रहिवाशांकडू टोल वसूल केला जातो.
आ पल्याला टोल मुक्ती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी करत आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने, अनेक भेटी गाठी करूनदेखील ही मागणी पूर्ण झालेली नाही. हरी ओम नगर येथे ५० पेक्षा जास्त इमारती आहेत तर २६ गृहनिर्माण सोसायटी आहेत. इथे दहा हजारपेक्षा जास्त मुंबईकर राहतात. त्यांनी आता मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!