ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-


मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने मात्र पाठिंबा नाकारला आहे कारण शिवसेनेत येण्याची सेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय परिणामी मराठा समाज शिवसेनेवर नाराज झाला आहे.
विधानसभेत शिवसेना 56,राष्ट्रवादी 54,भाजप 105 काँग्रेस 44 तर अपक्ष 29 असे संख्याबळ आहे त्यामुळे भाजपचे 2 तर सेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी1 उमेदवार निवडून येऊ शकतो अशा स्थितीत सहाव्या जागेसाठी संभाजी राजे मैदानात आहेत त्यांना शिवसेनेतर्फे ऑफर होती मात्र शिवसेनेत जाऊन त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास संभाजी राजेंनी नकार दिला त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून पाठीना देण्यास शिवसेनेने नकार दिलाय संभाजी राजे यांचा मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजावर मोठा प्रभाव आहे मात्र सेनेने पाठिंबा नाकारल्याने मराठा समाज नाराज आला असून त्याचा पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!