ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट

सातारा दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी किल्ले प्रतापगडास सहकुटुंब भेट दिली.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह किल्ले प्रतापगडावरील ग्रामस्थ उपस्थित होते.

 राज्यपाल श्री बैस यांनी स्वतः पायी किल्ला चढून जाऊन गडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले व सहकुटुंब देवीची पूजा केली. तसेच गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. तसेच पंचायत समिती, शिक्षण विभाग, महाबळेश्वरच्या शिक्षकांनी अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला. 

शिवकालीन खेडेगावास दिली भेट

राज्यपाल श्री बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली.

 शिवकालीन खेडेगाव येथे इतिहासाचे चांगले जतन केले आहे  याठिकाणी पूर्वीच्या काळी लोकजीवन कसे होते हे पहायला मिळाले. हा इतिहास भावी पिढीला पहावयास मिळतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!