डोंबिवलीतील केमिकल कंपनीत स्फोट – ८ ठार ६४ जखमी
डोंबिवली – आज डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली आणि पुढील निर्देश दिले.
डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही कार्संचंही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. आता या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. एक्स पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान या प्रकरणी दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली जाणार आहे ,