ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डॅमेज कंट्रोल होईल का?


एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही पवार म्हणतात गोहाती येथे गेलेले आमदार मुंबईला परत आल्यावर निश्चितपणे आम्ही बहुमत सिद्ध करू पण ते आता वाटते तितके सोपे नाही .कारण शिंदेंच्या मागे भाजपची मोठी ताकत उभी आहे म्हणून तर गोहातीच्या हॉटेल मध्ये थांबलेल्या सेनेच्या बंडखोर आजारांची रोज 8 लाख रुपयांचा खर्च केला जातोय . मग भाजप वाले हा खर्च वाया जाऊ देतील का ? त्यातच शिंदेंनी त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले आहे . अशावेळी बंडखोर परत फिरतील असे वाटत नाही आता फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे कायद्याचा किस काढून या आमदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवणे .त्यासाठी महाविकास आघाडी आणि त्यांच्या सोबत असलेले सगळे कायदेतज्ञ कामाला लागलेत .शिंदे हे जरी बंडखोरांचे नेते असेल तरी ते तितकेसे हुशार नाहीत आता त्यांच्या प्रत्येक चाली मागे भाजपती ल डोके आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सारखे धुरंदर लोक आहेत जे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत .

त्यामुळे सत्ता संघर्षाच्या लढाईत कोण बाजी मारणार ते लवकरच दिसेल.मात्र पवार जर प्रयत्न करणार असतील तर त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश यायला हवे कारण या बंडाचा पुढे होऊ घातलेल्या 14 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर परिणाम होणार आहे.आणि भाजपने जर बाजी मारली तर महाराष्ट्रातल्या दलीत मुस्लिम आणि ओबीसी समाजाचे काही खरे नाही.अहो जे लोक आपल्या पक्षातल्या दलीत ओबीसी नेत्यांना पुढे येऊ देत नाही ते शिंदेंचा टिकाव लागू देतील का ? भाजपच्या नादी लागलेल्या शिंदेंवर पुन्हा रिक्षा चालवायची वेळ आली नाही म्हणजे झालं

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर आता इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले वेग वेगळ्या अँ गलने अकलेचे तारे तोडत आहेत .दोन्ही कडच्या नेत्यांना हव्या असलेल्या बातम्या पेरल्या जात आहेत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची सुपारी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील लोकांनी घेतली आहे त्यामुळे आता टीव्ही वरच्या बातम्या नकोशा वाटायला लागल्या आहेत.लोकांना यात काही विशेष वाटत नाही कारण राजकारणातील हा गलिछपणा लोकांच्या परिचयाचा आहे .पण इलेक्ट्रॉनिक मिडिया वाले मात्र महाराष्ट्रावर फार मोठे संकट आले आहे असे चित्र उभे करीत आहेत त्यांच्या बुध्दीची आणि लाचारीची कीव करावीशी वाटते .

error: Content is protected !!