पोलिओ डोस कामात अनधिकृत व्यक्तीचा वावर ?
विरारमध्ये पोलिओ डोसबाबत मोठी मोहीम राबविली जात असून आरोग्यसेविका घराघरात जाऊन तपासणी व चौकशी करत असताना काही अल्पवयीन व्यक्तीची या कामावर अनधिकृतपणे बेकायदापणे नियुक्ती केल्याचे जाणवते पोलिओ डोसबाबत इमारतीत घराघरात जाऊन मार्किंग केले जात आहे. हे मार्किंग करण्याचे काम कोणतेही नियुक्तपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींकडे सोपविल्याचे विरारमध्ये पहायला मिळते.
कोणतेही नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना राज्य शासनाने-स्थानिक स्वराज्य संस्थेने पोलिओ डोससंबंधी मार्किंग किंवा अन्य जबाबदारीची कामे करण्यास नेमले आहे काय? दक्ष नागरिकांना हा प्रश्न पडला आहे. कारण आरोग्यसेविकाही याबाबत समाधानकारक उत्तरे देत नाहीत हे विशेष!