ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी

मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत संतापाची लाट उसळली आहे .
काल विधानसभेत मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला होता यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून पुढील दोन वर्षात मुंबईच्या रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही दरम्यान मुंबईच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांवरील चर्चेत भाग घेताना भाजपचे कांदिवलीचे आमदार योगेश सागर हे म्हणाले की मुंबईच्या रस्त्यावर किती इम्जन्सी काम करतात.मुंबईत वाहनांची संख्या आणि रस्त्यांचा प्रश्न मोठा आहे डीपी रोड विकासकाच्या ताब्यात ठेवता नयेत हे महापालिकेचे नियोजित रस्ते आहेत . डी पी रस्त्यांच्या संदर्भात समिती नेमून तिच्या शिफारशीनुसार निर्णय घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली इथवर ठीक आहे पण बोलताना त्यांनी मुंबईबद्दल एक आक्षेपार्ह विधान केले आहे ते म्हणाले गरीब की जोरू सबकी भाभी ! याचा अर्थ काय ? याचा अर्थ एकच आणि तो म्हणजे कुणीही यावे आणि मुंबईला कसेही वापरावे .ज्या मुंबईचे अन्न खाता ज्या मुंबईने तुम्हाला आसरा,नाव ,पैसा आणि राजकीय प्रतिष्ठा दिली त्या मुंबईला सबकी भाभी म्हणताना त्यांना जराही लाज कशी वाटली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहे त्यामुळे यावरून आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!