आझाद मैदानातील होमगार्डच्या आंदोलन चिघळणार
मुंबई – आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात होमगार्डच्या आंदोलन सुरु आहे मात्र सरकारी पातळीवर अजूनही या आंदोलनाची पुरेशी दाखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे
विविध मागण्यांसाठी होमगार्ड जवानांचे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे. विविध सण, उत्सव, मिरवणुका, गणेशोत्सव, जत्रा, मोर्चे, निवडणूक, संप, नैसर्गिक आपत्ती, भूकंप अशा वेळी पोलिसांबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड जवान कर्तव्यावर असतात. त्यांना केवळ ६७० रुपये भत्ता दिला जातो. तसेच महिन्यातून केवळ एकच दिवस सुटी दिली जाते. रेल्वे आणि इतर काही महत्त्वाची ठिकाणे सोडली तर होमगार्ड बेरोजगारीत असतात. त्यामुळे आम्हाला महिन्याचे २५ दिवस काम मिळावे, आदी विविध मागण्या यावेळी होमगार्ड जवानांकडून करण्यात आल्या. हे आंदोलन प्रतापराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असून त्यांच्याबरोबर गणेश जगदाळे, भूषण ठाकूर, चैतन्य मासुलकर, सुनीता मेहेर आणि निर्मला साळवी यांच्यासह सव्वाशे महिला आणि पुरुष होमगार्ड जवान उपस्थित आहेत.