नेपाळमध्ये बस नदीत कोसळून २७ ठार – बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील
काठमांडू – महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये ४० प्रवासी होते. या अपघातात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली.बस मधील बहुतेक प्रवासी जळगाव जिल्ह्यातील आहेत
ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात होती. त्यानंतर तनहुन जिल्ह्यातील आयना पहाडा येथे सकाळी ११. ३० वाजता ती महामार्गावरून ५०० फूट खाली नदीत पडली. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील भुसावळचे रहिवासी होते. सर्वजण नेपाळला फिरायला गेले होते. तनहुनचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी सांगितले की, काही जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नेपाल पोलिस, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ आर्मी शोध आणि बचाव कार्य करत आहेत. घटनास्थळी सशस्त्र पोलिस दलाच्या (एपीएफ) ४५ जवानांची एक तुकडीही उपस्थित आहे. नेपाळ लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर काठमांडूहून वैद्यकीय पथकाला घेऊन तनहुनकडे रवाना झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारन
गो रखपूरचे डीएम कृष्णा करुणेश यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. बसचा क्रमांक यु पी ५३ एफ टी ७६२३ आहे. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
सुमारे 4 महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या 3 बसेस महाराष्ट्रातून बुक केल्या होत्या. सुमारे ११० लोकांना घेऊन तीन बस २० ऑगस्ट रोजी नेपाळला पोहोचल्या. या बसेस २९ ऑगस्टला परतणार होत्या.
आज एक बस नदीत पडली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.