ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

भाजप च्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या तरच विचार करू फडणविसांची क्रॉंग्रेसला अट

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सालव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 4 ऑक्टोबरला निवडणूक होत असून क्रॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे .मात्र रजनी पाटील या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी क्रॉंग्रेसणे भाजपला त्यांचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे . याबाबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात , नाना पाटोळे यांनी देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी तुम्ही आमच्या 12 आमदारांचे अगोदर निलंबन मागे घ्या मग बघू अशी अट घातल्याचे समजते .मात्र फडणवीस यांनी या बातमीचा इन्कार केला आहे आम्ही कधीही अशा प्रकारची सौदेबाजी करीत नाही असे फडणवीस यांनी संगितले.

error: Content is protected !!