शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाची परवानगी- शिवसेनेने मैदान मारले
मुंबई/ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी नकली शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .तसेच शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेची न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर या निर्णयाच्या विरोधात नकली शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.
1966 पासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो पण यावेळी शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता पण मुंबई महापालिकेने या दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली त्यामुळे शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली त्याला विरोध करणारी मध्यस्थी याचिका सेनेतील गद्दार आमदार सदा सरवणकर यांनी केली या याचिकांवर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली .मात्र न्यायालयाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली तसेच मुंबई महापालिकेला खडे बोल सूनवताना कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पालिका दसरा मेळाव्याला परवानगी नाकारू शकतं नाही असे सांगितले त्याच बरोबर शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले.