बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर
ठाणे/बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे आज मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांनी एन्काऊंटर केले त्याच्या एन्काऊंटर मुळे बदलापूर मध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुतांच्या अध्यक्षतेखाली आठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे
बदलापूर मधील एका शाळेत शिपाई असलेल्या अक्षय शिंदेने शाळेतील दोन लहान मुलींचे लैंगिक शोषण केले होते मात्र ही घटना उघडकीस येतात बदलापूरमध्ये अक्षय शिंदे च्या विरोधात रक्षक निर्माण झाला लोक रस्त्यावर उतरले आणि बदलापूर मध्ये नऊ तास रेल रोको करण्यात आला त्यानंतर अक्षय शिंदे ला अटक करण्यात आली सध्या अक्षय शिंदे न्यायालयीन कोठडीत होता त्याला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते आज दुसऱ्या एका प्रकरणात ठाणे क्राईम ब्रँचनी त्याचा ट्राजिस्ट रिमांड घेतला होता आणि त्याला तळोजा जेल मधून ठाण्याला आणले जात होते याच दरम्यान पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास वर येताच अक्षयने गाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कडचे रिवाल्वर जबरदस्तीने काढून घेतले आणि चार राऊंड फायर केले यातील एक गोळी इन्स्पेक्टर निलेश बोलेना पायाला लागली त्यानंतर पोलीस आणि केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला अक्षय शिंदे च्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे विरोधी पक्षाने अक्षय शिंदेची हत्या म्हणजे हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे तर सरकारने मात्र अक्षय शिंदे ला फाशी देण्याची मागणी करणारा विरोधी पक्ष आता कसा काय बदलला असे म्हणत विरोधी पक्षावर पलटवार केल्या आहे तर माझ्या मुलाला पोलिसांनी पैसे घेऊन मारले असा गंभीर आरोप अक्षय शिंदे च्या आई-वडिलांनी केले आहे पण अक्षयच्या एन्काऊंटर नंतर बदलापूर मध्ये मात्र महिलांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला
