ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

श्रीमंतांची दिवाळी- दुःख गरिबांच्या भाळी


दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात लोकांना कोणताही सन साजरा करण्यात आला नव्हता पण यावर्षी मात्र करोना गेल्याने दोन वर्षांनी का होईना लोकांना सर्व सण साजरे करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दिवाळी लोक मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.पण सगळ्यांच्याच नशिबी दिवाळीचा आनंद नाही ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्यामुळे दिवाळीचा प्रकाश नाही तर नैराश्याचां अंधार आहे. दिवाळीचे कपडे सोडाच घरात मुलाबलांसाठी गोडधोड करायलाही पैसा नाही.सरकारने अच्छे दीन चे स्वप्न दाखवले पणे एन दिवाळीत बुरे दीन बघायची लोकांवर पाळी आली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील शेतकऱ्याची दिवाळी अंधारात असताना शहरी भागातील कष्टकरी गरीब जनतेची सुधा जवळस तशीच अवस्था आहे कोरोनामुळे उद्योगधंदे बंद पडून ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. त्यांनी कशी दिवाळी साजरी करायची ? राजकारणी लोकांकडे पैसा आहे त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची दिवाळी तेजीत आहे. वास्तविक यावेळी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांना मदत करायला हवी होती. पण अफाट पैसा असूनही लोकांना मदत करण्याचा त्यांच्या कडे मनाचा मोठेपणा नसल्याने ते लोकांना मदत करू शकत नाही त्यांचा लोकांशी फक्त निवडणुकी पुरता संबंध येतो.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील कष्टकरी दोघांचीही अवस्था सारखीच आहे

कारण तिथल्या उपेक्षित माणसांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तो दिवाळीचा खरा आनंद! नाहीतर ज्यांच्याकडे पैसा आहे ते धूमधडाक्यात दिवाळी साजरी करीत आहेत आणि ज्याच्याकडे काहीच नाहीत ते हतबल होऊन घरात बसलेत त्यांची मुलेबाळे दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत आहेत अशा पद्धतीची दिवाळी असेल तर त्यातून आनंद मिळण्याऐवजी मनाला यातना होतील . कारण खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी आणि शहरी भागातील मजूर हे सुधा आपले देश बांधव आहेत अशावेळी दिवाळी सारखा सण साजरा करताना दिवाळीच्या प्रकाशाची किरणे त्यांच्याही घरात पडवीत आणि त्यांची झोपडी प्रकाशने न्हावून निघावी अस प्रत्येकाला वाटायला हवे आणि त्यासाठी दिवाळी सारखा सण खेड्यापाड्यातील वस्त्यांवर साजरा व्हायला हवा तरच दिवाळीच्या खऱ्या आनंदाची अनुभूती मिळेल .आणि हे सहज शक्य आहे कारण प्रत्येक गावात ग्राम पंचायत आहे .आणि आजकाल या ग्रामपंचायतीमध्ये वेग वेगळ्या पक्षाचे लोक काम करीत आहेत त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे या लोकांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायती मार्फत दिवाळी साजरी केली जावी त्यासाठी गावातील प्रत्येक घरासाठी फराळाला लागणारी वस्तूंचे वाटप केले जावे गरिबांच्या मुलांसाठी फटाके आणि शक्य असेल तर कपडे वाटप केले जावे जेणेकरून त्यांचीही दिवाळी गोड होईल .सगळ्याच गोष्टी सरकार करणार नाही .आणि सरकारने या वर्षी दिवाळी कीट वाटप केले आहे त्यात एक एक किलो चना डाळ,साखर,तेल आणि रव्यासारख्या वस्तूंचा समावेश होता सरकारचा भलेही उद्देश चांगला असला तरी या वस्तूंचे वाटप करताना काय काय घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले .त्यामुळे दिवाळीत असे काही व्हायला नको ग्राम पंचायती मार्फत जर लोकांना या वस्तूंचे वाटप झाले तर लोकांना या वस्तू वेळेवर मिळतील आणि त्यांचीही वेळेवर दिवाळी साजरी होईल .

error: Content is protected !!