ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई जनसत्ता स्पेशल स्टोरी लढा एसटीच्या विलीनीकरणाचा “

जालीयनवाला बागेतील हत्याकांड जरी इथे घडला तरी, मागे हटणार नाही – शरद कोल्हे

थेट आझाद मैदानातून एसटी आन्दोलना बाबतचा दिलेला विशेष वृत्तांत

…ही शेवटची लढाई आहे
,आता करो या मरो अशी आमची परिस्थिती ! एसटी चालक शरद कोल्हे यांचे संतप्त उदगार

( दिनेश मराठे )
मुंबई : … ही शेवटची लढाई आहे.माझे मुळ मुळ गाव शिर्डी आहे तर नौकरी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मध्ये आहे.तरी देखील एक महिन्याचे बाळ आणि पत्नीला घरी सोडून मुंबईत संपाच्या लढाईत सहभागी झालो आहे.तुटपुंज्या पगारात घर चालत नाही. तरीदेखील अजून धिर सोडला नाही.आत्महत्या करने चुकीचे जरी असले तरी,उद्या मुलगा मोठा झाल्यावर त्याला काय उत्तर देऊ,त्याला चांगल्या शाळेत शिक्षण देण्याची ऐपत सुद्धा नाही.त्यामूळे आझाद मैदानातील संपाला आता नऊ दिवस झाले असून, जालीयनवाला बागेतील हत्याकांड जरी इथे घडला तरी, मागे हटणार नाही. यातूनच माझ्या मुलांचे भविष्य ठरणार असल्याचे अहेरी आगारातील चालक तथा वाहक पदावर नियुक्त शरद कोल्हे आपली व्यथा मांडतात.

केंद्र सरकारने किमान वेतन कायदा आणला आहे.मात्र,राज्य सरकारने इतर महामंडळाला हा कायदा लागु केला मात्र, एसटी महामंडळात अद्याप कायद्याची अंमलबजावणी केली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. किमान वेतन कायदा लागु झाला असता, तर कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ आली नसती. कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आत्महत्या केल्या नसत्या,शरद कोल्हे यांना 12 हजार 500 रूपये बेसीक आहे.भत्ते मिळून 16 हजार रूपये पगार मिळतो.घरभाडे 4 हजार रूपये,जिवनावश्यक वस्तु,आरोग्य,एक महिन्याच्या मुलाचे आरोग्य असा खर्च वजा करून हाती काही शिल्लक राहत नसल्याचे ते सांगतात.ग्रामीण आणि शहराच्या खर्चाचा विचार केल्यास एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तुटपुंजे आहे.

24 तास काम केल्यावर चार ते पाच तास ओव्हरटाईम काम करण्यासाठी घरदार सोडून काम कराव लागते. तेव्हा कुठे पगाराची रक्कम वाढते.
ओव्हरटाईम करतांना शारीरीक मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागते. जेष्ठ कर्मचाऱ्यांचे बेसीक सुमारे 20 हजार आहे. तर निवृत्ती पर्यंत जास्तीत जास्त बेसीक 25 हजारांपर्यंत जाते. या पगारात निवृत्त होईपर्यंत स्वतहाच्या मालकीचे घर तर सोडाच मुलाबाळांचे शिक्षण सुद्धा करणे शक्य नाही.नगरपालीकेच्या, जिल्ह्या परिषदेच्या शाळेतच एसटीच्या कर्मचाऱ्यांचे मुले शिकतात,नाहीतर एसटी बँकेतून कर्ज काढावे लागते,दोन लाखाचे कर्ज जरी घेतले तरी निवृत्ती होईपर्यंत ते फेडले जात नाही.एसटीच्या बँकेच्या जाचक अटी शर्तीला सुद्धा एसटी कर्मचारी कंटाळले आहे.त्यामूळे आता अस्तित्वाची लढाई म्हणून संपात उतरलो आहे. निलंबनाचे आदेश एकदम किरकोळ बाब आहे.जालीयनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती जरी झाली तरी आम्ही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. आजवर 40 आत्महत्या झाल्या त्याचे सरकारला देनघेणं नाही.येवढे लोक मरूनही त्यांच्या कुटूंबीयांना सात्वंन पत्रही पाठवले नाही.तर साधी श्रद्धांजली सुद्धा वाहिली नाही. लोक किड्यामकोड्या सारखे मरत आहेत.विचारपुस तर सोडाच,सात्वंन सुद्धा करत नसल्याची खंत शरद यांनी व्यक्त केली.

ही शेवटची लढाई आहे. यात आम्ही जिंकु किंवा मरू यावरच आम्ही ठाम आहोत. 2016 मध्ये एसटी महामंडळात भरती झालो.ज्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी दोन महिने शिल्लक आहे.असेही कर्मचारी सध्या संपात आहेत. 27 आॅक्टोबर रोजी कृती समितीने बेमुदत उपोषण पुकारले, मात्र,भत्ते मंजुर झाल्यानंतर हा बेमुदत उपोषण परत घेतल्या जाईल हे अपेक्षीतच होते. मात्र,नेहमीच्या मरणापेक्षा एकवेळचे मरण बरे असा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला.कृती समितीने आपले बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यात उत्स्फूर्तपणे संप पुकारला ज्यामध्ये सहभागी होऊन 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झालो.अजुनही आझाद मैदानात बसून आहे.
28 टक्याच्या भत्त्याने फार काही पगारात वाढ झाली नाही.त्याचा कर्मचाऱ्यांना कोणताही फायदा नाही.
एक महिन्याचे बाळ घरी सोडून आलोय.उसने पैसे घेऊन अस्तित्वाच्या लढाईसाठी आझाद मैदानात लढा देत असल्याचे शरद सांगतात.

सकाळी पाच वाजता उठायचं,झोपायची जागा झाडून काढणे, महानगरपालीकेच्या स्वच्छतागृहात जाणे, त्यानंतर मिळेत तिथे मोबाईल चार्ज करून आझाद मैदानात बसून आंदोलनात सहभाग आणि सामाजिक संस्थांकडून जेवणाची व्यवस्था होते.त्यानंतर पुन्हा उघड्या मैदानात झोपायचे, घरच्यांचे फोन येतात. मात्र, दोघांनीही ठाम निर्णय घेतला आहे. कमवता ऐकटा असल्याने मनाशी ठरवल आहे की अभी नही तो कभी नही. उद्या जर आंदोलन मोडीत निघाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही.मात्र,राज्य सरकारने तशी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांपुढे निर्माण केली आहे. रोज पत्नी फोन करून लढण्यासाठी पाठबळ देते. त्यामूळे इथे लढू शकतो आहे. या संपातून सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे उद्याचे भविष्य ठरणार आहे असे शेवटी शरद कोल्हे शांतपणे सांगतात.

error: Content is protected !!