ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईत भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी

मुंबई/विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालावर नजर मारली असता एक गोष्ट लक्षात येते की मुंबईमध्ये भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 23 आमदार तर महाविकास आघाडीला फक्त 12 आमदार निवडून आले. मुंबई हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड असतानाही या ठिकाणी भाजपाने बऱ्यापैकी जागा मिळाल्यात. दक्षिण मुंबई शिवसेनेचे खासदार असतानाही इथल्या काही जागा महायुतीने पटकावले आहेत.
      मुंबई मतदार संघात काँग्रेसचे अमीन पटेल यांनी श्रीमती शायना  यांचा पराभव करून आपली जागा कायम ठेवलेली आहे तर कुलाबा मतदारसंघातून भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी आपला गड कायम राखला.  मलबार हिलमधून भाजपाचे मंगल प्रभात लोढा  चांगल्या मताने विजयी झाले तर भायखळा मतदार संघात लागोपाठ त्याच उमेदवाराला रिपीट केल्याने शिंदे गटाच्या यामिनी जाधव पराभूत झाल्या तिथे ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांनी विजय मिळवला. शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला तर वडाळ्यामध्ये भाजपचे कालिदास कोलमकर नव्या वेळी निवडून आलेत. त्यांचा हा एक मोठा विक्रमच म्हणावा लागेल.
     वरळी मधून आदित्य ठाकरे जरी विजयी झालेत असले तरी त्यांचे विजयाचे अंतर खूप कमी झालेले आहे.
हे घटलेले मताधिक्य चिंतन करावयास लावणारी आहे . संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघात मनसेला मोठे अपयश आले या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून जे राजकारण झाले होते. त्या राजकारणाचा अर्थातच राजपुत्र अमित ठाकरे यांना फटका बसला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पराभव सहन करावा लागला. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे महेश सावंत विजय झाले. बांद्रातून बाबा सिद्दिकी चा मुलगा उमेदवार याला अपयश आले वरून देसाई यांचा विजय झालेत परंतु बांद्राच्या दुसऱ्या मतदारसंघात मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या अन्य मतदारसंघापैकी बोलायचं झाल्यास मालाड मधून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या तर चारकोप मधून भाजपचे योगेश सागर विजयी झाले. संजय निरूपण याला पराभव पत्करावा मुख्य म्हणजे या निवडणुकीत शिवाजीनगर गोवंडी मतदारसंघातून अजित पवारांच्या तिकिटावर उभे राहिलेले नवाब मलिक यांचा दारुण पराभव झाला त्या ठिकाणी  अबू आजमी विजयी झाले अर्थात नवाब मलिक जरी पडले तरी त्यांची कन्या सना मलिक  अणुशक्ती नगर  मतदारसंघातून विजयी झाली . अशा तऱ्हेने मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि महाविकास आघाडीला बॅक फुटवर ढकलले. या निकालाचे परिणाम भविष्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहावयास मिळणार आहेत.
मुंबई मतदारसंघातील निकाल-
* मलबार हिल विधानसभा मतदारसंघ–  मंगलप्रभात लोढा (भाजप)
* बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
* वडाळा विधानसभा मतदारसंघ– कालिदास कोळंबकर (भाजप)
* कुलाबा विधानसभा मतदारसंघ– राहुल नार्वेकर (भाजप)
* वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ– आशिष शेलार (भाजप)
* अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ– मुरजी पटेल (भाजप)
* कांदिवली विधानसभा मतदारसंघ– अतुल भातखळकर (भाजप)
* अणशुक्तीनगर विधानसभा मतदारसंघ– सना मलिक (अजित पवार गट)
* माहीम विधानसभा मतदारसंघ- महेश सावंत (ठाकरे गट)
* दहिसर विधानसभा मतदारसंघ-  मनीषा चौधरी (भाजप)
* वरळी विधानसभा मतदारसंघ- आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
* शिवडी विधानसभा मतदारसंघ- अजय चौधरी (ठाकरे गट)
* विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
* शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पक्ष)
* कु्र्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
* मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
* भायखळा विधानसभा मतदारसंघ- मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
*  चेंबूर विधानसभा मतदारसंघ-  तुकाराम काते (शिंदे गट)
*  कलिना विधानसभा मतदारसंघ– संजय पोतनीस (ठाकरे गट)
*  वर्सोवा विधानसभा मतदारसंघ–  हारुन खान (ठाकरे गट)
* जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ– अनंत नर (ठाकरे गट)
* अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अमित साटम (ठाकरे गट)
* मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ– अमिन पटेल (काँग्रेस)
* वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई – ठाकरे गट*

* मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अस्लम शेख (काँग्रेस)
* दिंडोशी विधानसभा मतदारसंघ–  सुनील प्रभू (ठाकरे गट)
* गोरेगाव विधानसभा मतदारसंघ–  विद्या ठाकूर (भाजप)
*  चारकोप विधानसभा मतदारसंघ– योगेश सागर (भाजप)
*  मागाठाणे विधानसभा मतदारसंघ– प्रकाश सुर्वे (शिंदे गट)

* वसई-विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला यंदा मोठा धक्का बसला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.
वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर क्षितीज ठाकूर यांनाही नालासोपारा विधानसभेत हार पत्करावी लागली.

* सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा मतदार संघातून भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांचा दणदणीत विजय झाला आहे तर   इस्लामपूर मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अवघ्या 13000 मतांनी विजय मिळवला.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघाचाही पहिल्याच निवडणुकीत मिळवली सव्वा लाख मतं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी मिळवून बाजी मारली .

error: Content is protected !!