ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सिक्कीममध्ये ट्र्क दरीत कोसळून १६जवान शाहिद


जेमा- सिक्कीम मध्ये आज एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे . लष्कराचे एक पथक चतन वरून ठंगूकडे जात असताना लष्कराच्या ताफ्यातील एकट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जावं शाहिद झाले आहेत

उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये जवानांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जवानही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की,२३ डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लष्कराने सांगितले की, अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्यातील एक होते. जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि खाली दरीत कोसळले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले.

error: Content is protected !!