ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

फडणवीसांवर सोमवारी हक्कभंग ठराव


नागपूर – दिशा सालियन प्रकरणी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे सोमवारी फडणवीस यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार आहेत . त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे

देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दिशा सालियान प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप त्यांनी केला. नाना पटोले एबीपी माझाशी संवाद साधत होते.

दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयने केला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल (22 डिसेंबर) केला होता. याविषयी नाना पटोले म्हणाले की, “त्यावेळी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी सीबीआयकडे कम्प्लेंट केली होती. त्यानंतर मग सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाची देखील चौकशी केली होती, असा रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. फडणवीस यांनी सभागृहात खोटी माहिती दिली. हा सभागृहाचा अवमान आहे. आम्ही सोमवारी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार आहोत. खोटी माहिती देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याची विचारणा आम्ही करणार आहोत.”

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयने नोव्हेंबर 2022 मध्ये सीबीआयने खुलासा केल्याचं आमच्या वाचनात आहे. त्यात ती चौदाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडली असा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. त्याचा अहवाल सादर करुन हा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगितलं. असंही अजित पवार यांनी सभागृहात म्हटलं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुद्द्यामधील एक गोष्ट दुरुस्त केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा न्यूज रिपोर्टच्या आधारावर बोलले. मूळात दिशा सालियान प्रकरण कधीच सीबीआयकडे गेलं नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलं आहे. सीबीआयला दिशा सालियान प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही केस आमच्याकडे नाही. आम्ही चौकशी केलेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. सीबीआयकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरण आहे. त्यासंदर्भात त्यांनी फॉरेन्सिकचे रिपोर्ट दाखवले आहेत. मी या सभागृहाला आणि विरोधी बाकांवर बसलेल्या लोकांना सांगतो की कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता, कोणालाही टार्गेट न करता नवीन पुरावे काही असतील तर त्यासंदर्भात चौकशी होईल.

error: Content is protected !!