ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

कर्मयोगी स्वर्गीय नाथाशेठ जाधव यांचे जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मु. पो. टाकवे, ता. शिराळा, जि. सांगली .कर्मयोगी स्वर्गीय नाथाशेठ जाधव, मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ मुंबई संस्थेचे टाकवे हायस्कूल टाकवे, संस्थापक / माजी कार्याध्यक्ष यांचा जन्म दि. २० / ०२ / १९२३ साली मु. पो. टाकवे, ता. शिराळा, जि. सांगली येथे झाला होता. दि. २८/०९/२०१० रोजी त्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. कर्मयोगी नाथाशेठ जाधव हे थोर समाज सेवक होते. त्यांच्या कार्याचा आढावा व त्यांची जीवन गाथा सांगणारे नाटककार सुरेश जाधव यांनी पुस्तक लिहून ते प्रकाशित केलेले आहे.

या वर्षी म्हणजे सन २०२३ मध्ये त्यांचा जन्म शताब्दी सोहळा असून बुधवार दि.. १८/०१/२०२३ रोजी कर्मयोगीच्या आठवणींना उजाळा व मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मभूमी नगरीत त्यांच्या प्रयत्नांनी स्थापन केलेल्या टाकवे हायस्कूल विद्या मंदिरात टाकवे गावच्या भागातील एकून बारा शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा नाथा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आली होती.

” नाथा प्रतिष्ठान ” ही सामाजिक कार्य करणारी संस्था कर्मयोगी यांची कन्या (जयश्री) प्रेरणा नाईकरे यांनी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथे स्थापन केलेली आहे. ती संस्था रजिस्टर असून नोंदणी क. – महा / ७४० / २०१९ ठाणे अशी आहे. टाकवे गावच्या पंचकोशीतील, टाकवे, बांबवडे, पाचुंबी पणुबे, गिरजवडे, भैरववाडी, शिवरवाडी, घागरेवाडी, पुदेवाडी, शिरशी, धामवडे, वाटेगाव. या गावातील मराठी शाळा व हायस्कूल मधील सर्व मुख्याध्यापकांना रीतसर पत्र देउन चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सर्व शाळेतून एकून ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .

बुधवार दि. १८ / ०१ / २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता टाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. खाडे सर यांचे शुभहस्ते श्री सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करुन चित्रकला स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर संस्थापक / माजी कार्याध्यक्ष कर्मयोगी स्वर्गीय नाथाशेठ जाधव, माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब माने, माजी उपाध्यक्ष स्वर्गीय आण्णासाहेब बर्डे, माजी सरचिटणीस स्वर्गीय पी. एच. रावते (तात्या),स्वर्गीय बापूराव जाधव, स्वर्गीय माधवराव भोसले यांच्या प्रतिमांना मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ मुंबई संस्थेचे व नाथा प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी यांनी पुष्पहार घालून पूजन केले. इतर सर्व ग्रामस्थ व शिक्षक यांनी पुष्पांजली वाहून नमन केले. त्यानंतर ठिक ११ वाजता चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. चित्रकला स्पर्धेची वेळ ११ ते २ पर्यंत होती. दुपारी २ ते ३ या वेळेत सर्व विद्यालयातील स्पर्धक, इतर विद्यार्थी, बाहेरुन आलेले सर्व शिक्षक, दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित ग्रामस्थ यांच्यासाठी विजय मारुती रावते, सौ. राजश्री उर्फ श्वेता संदीप शिंदे, सुर्यकांत बंडू जाधव यांच्या वतीने भोजनाची सोय करण्यात आली.

दुपारी ३:३० या वेळेत मौजे टाकवे ग्रावविकास मंडळ मुंबई संस्थेचे संचालक विजय भाऊ भोसले, पांडूरंग नानासो माने, शंकर आत्माराम बोबडे, भगवान बाबासो रावते , शंकर विष्णू जाधव, मोहन पांडूरंग रावते, तसेच आनंदराव यवतकर, विजय मारुती रावते , बाळकृष्ण जाधव, नाथा प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्रीमती प्रेरणा नाईकरे, अमृत देसाई, कृणाल साळवे, सौ. वृषाली परब, टाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक खाडे सर, के. ए. रावते सर, आर. सी. पाटील गुरुजी, अशोक शेवाळे गुरुजी, समता हायस्कूल पाचुंब्री मुख्याध्यापक पाटील सर, अंनत सपकाळ गुरुजी .इतर शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. खाडे सर, के. ए. रावते सर, पांडूरंग माने, अनंत सपकाळ गुरुजी, सूर्यकांत जाधव, प्रेरणा नाईकरे यांची भाषणे झाली . दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, मेडल्स देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या ३५० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तिन्ही गटातील सर्व उत्कृष्ट स्पर्धक –

अ गट कु. पार्श्व महावीर पाटील इ. चौथी, जि. प. शाळा, टाकवे.

ब गट- कु. गार्गी अजित खोचरे – इ. सहावी, टाकवे हायस्कूल, टाकवे.

क गट कु. सिद्धी रामचंद्र झेंडे – इ. दहावी, जि. प. शाळा, पाचुंब्री

अ. ब. क. या तिन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतिय क्रमांक विभागून.

अ गट – १. आदिती विजय माने.-इ. दुसरी, जि. प. शाळा पाचुंब्री (प्रथम क्रमांक) -आर्या बाबुराव माने
इ. तिसरी, जि. प. शाळा पाचुंब्री (प्रथम क्रमांक)

२. प्रज्वल प्रविण खराडे भार्गव पुंडलिक भोये – इ. पहिली, जि. प. शाळा भैरववाडी. (दुसरा क्रमांक) – इ. चौथी, जि. प. शाळा भैरववाडी (दुसरा क्रमांक)

३. सई संदीप पवार – इ. चौथी, जि. प. शाळा, पाचुंबी (तिसरा क्रमांक)
काव्या बजरंग पाटील इ. तिसरी, जि. प. शाळा, पाचुंबी (तिसरा क्रमांक) –

ब गट- १. तनिष्का गणपती लोहार – इ. सातवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (प्रथम क्रमांक) धनराज उमेश पाटील – इ. सातवी, टाकवे हायस्कूल, टाकवे (प्रथम क्रमांक)

२. यश विजय पाटील – इ. सहावी, जि. प. शाळा, पाचुंब्री (दुसरा क्रमांक)
श्रीयश जगन्नाथ खराडे – इ. सातवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (दुसरा क्रमांक)

३. स्वरा संदीप ठोंबरे इ. पाचवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (तिसरा क्रमांक) श्रेयश संदीप यादव –
इ. सहावी, टाकवे हायस्कूल, टाकवे (तिसरा क्रमांक)

एक गट १. आसावरी भिमराव ताटे इ. नववी, श्री भैरवनाथ विद्यालय शिरशी
(प्रथम क्रमांक)
साक्षी अजय पाटील – इ. दहावी, समता हायस्कूल पाचुंब्री (प्रथम क्रमांक)

२. आयुष दिपक खराडे – इ. नववी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (दुसरा क्रमांक)
जीवन तानाजी शेळके इ. आठवी, सौ. कल्पनाताई ग. मोहिते विद्यालय, धामवडे (दुसरा क्रमांक)

३. ऋतूजा लक्ष्मण सवादकर इ. आठवी, सौ. कल्पनाताई ग. मोहिते धामवडे (तिसरा क्रमांक) वैष्णवी वैभव माने – इ. नववी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (तिसरा क्रमांक)

इ. ८ वी ते इ. १० वी विशेष पारितोषिक

१. श्रेया विश्वास जाधव – इ. नववी, भैरवनाथ विद्यालय शिरशी (प्रथम क्रमांक) –

२. गणेश उत्तम खराडे – इ. नववी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (द्वितीय क्रमांक)

३. अनुष्का शहाजी घागरे – इ. आठवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. (तृतिय क्रमांक)

तिन्ही गटातील उत्तेजनार्थ दहा स्पर्धक मेडल

१. तन्वी हंसराव माने – इ. दुसरी, जि. प. शाळा बांबवडे. इ. तिसरी, जि. प. शाळा भैरववाडी.

२. अनुष्का संदीप खराडे ३. राजवीर अविनाश इ. पहिली, जि. प. शाळा भैरववाडी.

४. श्रावणी विलास घागरे – इ. सहावी, टाकवे हायस्कूल, टाकवे.

५. संस्कृती राजेंद्र कुंभार – इ. सातवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. ६. मनस्वी धनाजी जाधव इ. पाचवी, जि. प. शाळा बांबवडे.

७. श्वेता विलास माने – इ. नववी, सौ. कल्पनाताई ग. मोहिते विद्यालय, धामवडे.

८. आर्यन सुनिल पाटील – इ. नववी, समता हायस्कूल, पाचुंब्री. ९. अर्थव सुर्यकांत मोरे – इ. आठवी, टाकवे हायस्कूल, टाकवे.

१०. निशाद संदीप कुंभार इ. आठवी, टाकवे हायस्कूल, टाकवे. – –

” नाथा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला कार्यक्रम व चित्रकला स्पर्धा उत्तम रित्या यशस्वी झाल्या.

error: Content is protected !!