कृषिमंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले – अमित शहा यांचा सवाल
मालेगाव – सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? असे प्रश्न भाजपचे नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकारीता मंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. केवळ मार्केटिंग करून नेता होणे पुरेसे नाही तर त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते, असा टोला देखील अमित शहा यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी यांनी सहकारिता मंत्रालयाची निर्मिती केली, इथेनॉल योजना आणली, अशा अनेक योजना नरेंद्र मोदी यांनी आणल्या असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. शहा यांनी नाशिकच्या मालेगाव येथे आयोजित “सहकार संमेलनात” सहकाराशी संबंधित विविध योजनांचा शुभारंभ केला आणि उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्रात सरकारी साखर कारखान्यात १५००० कोटी रुपयांचे प्राप्तिकराचे भांडण चालू होते. ते आम्ही संपवले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच नवीन ४६००० कोटींचा कर माफ करण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी सरकारने केले असल्याचेही अमित शहा यांनी म्हटले आहे. एनसीडीसीच्या माध्यमातून देशभरातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचे कर्ज दिले असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. इथेनॉल ब्लेंडिंग च्या माध्यमातून साखर कारखान्यांना पुन्हा एकदा उत्पन्न असलेले युनिट बनवण्याचे काम आम्ही केले असल्याचेही ते म्हणाल
अमित शहा यांनी या माध्यमातून शरद पवार यांच्या कारकीर्दीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी शरद पवार यांना काही प्रश्न विचारले आहेत. यामध्ये पवार शरद पवार हे दहा वर्ष देशाचे कृषिमंत्री होते त्यावेळी सहकारिता मंत्रालय हे त्यांच्या खात्याअंतर्गत येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी हिशोब द्यावा, असे आवाहनच शहा यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आंदोलनासाठी तुम्ही काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? पॅक्स साठी काय केले? शेतकऱ्यांसाठी काय केले? केवळ मार्केटिंग करून नेता होणे पुरेसे नाही, तर जमिनीवर राहून काम करावे लागते, असे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे.