लोकसभा निवडणुकीच्या काळात २ लाख बांगलादेशींना जन्म प्रमाण पत्राचे वाटप – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगला देशी रोहिंग्यांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तसेच यावरून त्यांनी विरोधकांवर देखहील निशाणा साधला आहे. विधानसभा आचार संहिता असताना व्होट जिहाद अंतर्गत उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, काही मुस्लिम संस्था आणि बांगलादेश यांनी मोठा गेम प्लॅन तयार केला होता. जुलैनंतर ठिकठिकाणी आचारसंहितेचा काळ असताना लोकसभा निवडणुकांत यांचा विजय झाला होता. म्हणून सरकार येणार असे पसरवले जात होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात त्या चार-पाच महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला. त्यांना उशिरा जन्मप्रमाणपत्र देण्यात आले आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, आतापर्यंत १ लाख ७ हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर ९० हजार अर्ज प्रलंबित आहेत. आपण मालेगावमध्ये गेलो होतो तेव्हा ही बाब पुढे आली, दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान उघड झाले आहे. मालेगावचे नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच उशिराने जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता थांबवण्यात आली असून ज्या १ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
पुढे किरीट सोमय्या म्हणाले, हे दोन लाख हजार अर्ज जेथून आले आहेत त्या ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली. त्यात ९ टक्के रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि हे कटकारस्थान मालेगावमध्ये सुरू झाले आहे. एटीएसला या कामाची चौकशी करण्यास सुचविले आहे. दोन लाख प्रमाणपत्राचे काम थांबवणे. चौकशी होऊन बांगलादेशी यांना परत बांगलादेशला पाठवविले जाणार आणि हा गेम प्लान करणाऱ्यांकडे मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला होता त्यातून हे पैसे आले आहेत, असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे