ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ईडी आणि सीबीआयचा वापर डरपोक लोक करतात-ठाकरे बरोबरच्या भेटीनंतर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल


मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीत सध्याच्या राजकीय विषयांवर चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी सांगितले कि उद्धव ठाकरे हे वाघाचे छावे आहेत ते पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले म्हणून घाबरणार नाहीत महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे, तसच जे लोक ईडी आणि सीबीआयचा वापर करतात ते डरपोक असतात अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला केला.
ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं असं केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबद्दल विचार करतो असं सांगत केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असंही ते म्हणाले.
कोरोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, आज लोकांना नोकऱ्या नाहीत, युवक बेरोजगार आहेत, याचवेळी देशातील महागाई वाढत आहे. एलआयसीसारखी कंपनी तोट्यात जोत आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा करुन देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालंय.

error: Content is protected !!