शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला तेलंगणातून अटक
हैदराबाद/इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला अखेर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तेलंगणा मधून अटक केली आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात प्रशांत कोतकर विरुद्ध संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्या प्रकरणी प्रशांत कोटकर वर गुन्हा दाखल केला होता पण तो फरार झाला होता तेव्हापासून गेला महिन्याभर तो गायब होता न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्यासमोर शरणागती शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता परंतु पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करून प्रशांत कोटकर याचे लोकेशन ट्रेसं केले आणि त्याला तेलंगणातील अटक केली प्रशांत कोटकर वरील कारवाई बाबत पोलीस योग्य ते प्रयत्न करीत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
