टोकाचे मतभेद
मुंबई/मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आज एक वेगळेच नाट्य बघायला मिळाले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच सर्व उपस्थित उठून उभे राहिले परंतु आदित्य ठाकरे मात्र उठून उभे राहिले नाहीत त्यांनी एकनाथ शिंदेंकडे पाहून आपले तोंड फिरवले अशा तऱ्हेने आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे शिंदेचा अवमानच केल्याचे बोलले जात आहे
रस्ते बांधकामावर चर्चेसाठी विधानसभा अध्यक्षांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती या बैठकीला आदित्य ठाकरें यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे काही आमदारही उपस्थित होते याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले काम आटपून या बैठकीसाठी आले एकनाथ शिंदेंची बैठकीत एन्ट्री होताच सर्व आमदार उभे राहिले परंतु आदित्य ठाकरे हे मात्र बसूनच राहिले इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे कडे पाहून त्यांनी तोंड फिरवली याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे काही दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येत असताना समोरून उद्धव ठाकरे ही आले यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे पाहिलेही नाही त्यांनी फडणवीस यांच्याशी थोडावेळ बातचीत केली आणि निघून गेले आजही एक प्रकारे तसाच प्रकार बघायला मिळाला त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या त किती टोकाचे मतभेद आणि दुश्मनी आहे हेच दिसून येते
