ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला


राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत

मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले.न्यायालयाने आज या दोघांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
रवी आणि नवनीत राना ही दोघं मुंबईत आली पण शिवसैनिकांनी त्यांच्या खरमधील घराबाहेर ठिय्या मांडला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना 149 ची नोटीस दिली पण मुजोर राणा दांपत्याने पोलिसांनाही जुमानले नाही मात्र बाहेर जसजसा शिवसेनेचा आवाज वाढला तेंव्हा आता आपली खैर नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपला बालहट्ट सोडला पण तोवर उशीर झाला होता पोलिसांनी त्यांना अटक करून खार पोलीस ठाण्यात नेले आणि काल सुट्टी कालीन न्यायालयात हजर केले यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अँड. प्रमोद घरात तर राणा दांपत्याच्या वतीने ऍड मर्चंट यांनी युक्तिवाद केला सरकारी वकिलांनी या प्रकरणी तपास करायचा असल्याचे सांगून पोलीस कोठडी मागितली पण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिलीय त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय पण त्यावर आता29 तारखेला सुनावणी होणार असल्याने तोवर या दोघांना आताच राहावे लागणार आहे नवणीतला भायखळा जेल मध्ये तर रवी रणाला आर्थर रोड किंवा तळोजा तुरुंगात राहावे लागणार आहे .

error: Content is protected !!