मला जास्त बोलायला लावू नका सर्व बाहेर काढीन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. तर पोराटोरांवर मी बोलत नाही, असे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेनी निशाणा साधला. एबीपी माझाशी ते बोलत होते.
आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय पण आजकाल खाल्यचा शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहे. कमरेखालचे वार या सगळया गोष्टी लोकांना नाही आवडत. लोकांना विकास हवा. आज जे काही आरोप होतात, खरं तरं सत्ता गेल्यानंतर काही लोकं सैरभैर झालेत. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय. पोरटोरांच्यावर मी बोलतं नाही. त्यांचं वय किती, त्याच्या कामाचा अनुभव, पक्षासाठी किती योगदान आहे, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताच पाणी केलेले लोक आहेत. लोकांकडून पाया पडून घेणं, लोकांना आवडतं नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. परंतु हे सरंजामदारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. यामुळेच हा इतिहास घडला आहे.मला जास्त बोलायला भाग पाडू नये, एकनाथ शिंदेंचा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नये.