ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत शपथविधीची लगबग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मत आमदार भरत गोगावले संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या घरात लगीनघाई जशी असते, तशी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची घाई सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळी चूल मांडल्यानंतर पक्षाला शिवसेना नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही.

दुसरीकडे, १६ आमदारांच्या सुनावणीबाबत देखील निर्णयही आला, त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा आहे. विस्ताराची तारीख अद्याप जाहीर होत नसली तरी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे लॅाबिंग करत आहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 10 आणि भाजपच्या 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता, आता दुसऱ्या विस्तारात तरी आपला नंबर लागेल, या आशेवर बरेच शिवसेना आणि भाजप आमदार आहेत. त्यासाठी, काही आमदारांनी मुंबई गाठली आहे, तर काही आमदार मुख्यमंत्र्यांची पाठच सोडत नाहीत. मंत्री पदाच्या हव्यासापोटी मुख्यमंत्र्यांचा जिकडे कार्यक्रम असेल तिकडे जाऊन हजेरी लावण्याचं काम काही आमदार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नजरेसमोर राहण्याचं काम आमदारांकडून सुरू आहे.

error: Content is protected !!