ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईत झाले नालेसफाईचे दोन बळी


मुंबई/आज मुंबईच्या गोवंडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सफाई करीत असताना नाल्यात पडून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.
गोवंडीच्या शिवाजीनगर भागात एका नाल्याची सफाई करीत असताना रामकृष्ण आणि सुधीर दास हे दोन कंत्राटी कामगार नाल्यात पडले दरम्यान काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे नाल्यात पाणी होते त्यामुळे या पाण्यात दोन्ही कामगार गुदमरले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशामन दलाली घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यात आले व राजावाडी रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाईचे हे दोन बळी आहेत.
मुंबईत अनेक छोटे मोठे झाले आहेत आणि पावसाळ्यापूर्वीच या नाल्याची सफाई केली जाते त्यासाठी पालिकेकडून प्रचंड खर्च केला जातो परंतु नालेसफाई करणारे कंत्राटदार मात्र नेहमीच नालेसफाईच्या कामात पालिकेला चुना लावतात. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा पाऊस सुरू असताना झाले सफाई करावी लागते अशावेळी नाल्यात पडून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी मुंबई घडले आहेत. आजच्या देखील घटनेने पालिकेच्या कंत्राटी कामात किती गलथानपणा असतो हे स्पष्ट झाले आहे

error: Content is protected !!