मान्सून महाराष्ट्रात दाखल पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबाई
मुंबई :मुंबई – महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची वाट पाहत होती तो पाऊस रविवारी पहाटे पासून कोसळू लागला. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले भायखळा.,परेल,मिलन , अंधेरी आणि दहिसर सबवेत पाणी तुंबल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली होती
भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी मारली आहे. मान्सून दाखल होता. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि नागपूर यांनी पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची कशी स्थिती असेल, या संदर्भात अॅलर्ट जारी केले आहेत.
हवामान विभागानं २६ ते २८ जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार २६ जूनला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान विभागानं जारी केलेल्या अॅलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.दरम्यन भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगात वाहू शकतात.