ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुण्यातील हॉटेल्स मध्ये ड्रग्ज साठा जप्त ५ जणांना अटक


पुणे : शहरात एका आमदाराच्या पुतण्याने मध्यरात्री बेदरकारपणे गाडी चालवत एका दुचाकीला उडवल्याची भीषण घटना घडली. त्यानंतर, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साईज अधिकारी कोट्यवधींचा हप्ता घेत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर, शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली असून आता कारवाईला गती मिळाली आहे. पुण्याच्या एका हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ५ जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत ५ जणांना घेतलं ताब्यात असून या ५ जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या हॉटेलचे 3 पार्टनर देखील पोलिसांच्या ताब्यात असून संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

error: Content is protected !!