ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराष्ट्रात लवकरच राईट टू हेल्थ कायदाआरोग्य मंत्र्यांची घोषणा

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत) यांच्याहस्ते आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन इमारत भूमिपूजन समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांनी अघोषित बहिष्कार टाकत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर भाजप पदाधिकाऱ्याने कार्यक्रमात भाषण करीत निषेध व्यक्त केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनीही भाजपच्या आजीमाजी आमदारांचे नाव न घेता खडे बोल सुनावले. या कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही भाजप आमदार समाधान आवताडे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव नसल्याने त्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे, हा भूमिपूजनपेक्षा राजकीय नाराजी नाट्यानेच हा कार्यक्रम जिल्ह्यात चर्चेत राहिला. मात्र, लवकरच राईट टू हेल्थ कायदा आणला जाईल,अशी घोषणाच मंत्री आरोग्य सावंत यांनी केली.
भाजप पदाधिकारी प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमात भाजपचे आजी माजी आमदार का आले नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारावा, अशी मागणी करीत कार्यक्रमाचा जाहीर भाषणात निषेध केला. त्यानंतर, आरोग्यमंत्री तातडीने बोलण्यास उभारले आणि या कार्यक्रमात कोणाला बोलावयाचे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे, माझ्या आरोग्य विभागाचा नाही असे त्यांनी म्हटले. मात्र, संवैधानिक पदावर असलेले व्यक्ती हे शासनाचे, प्रशासनाचे अंगीकृत भाग असतात, ज्यावेळी लोकार्पण किंवा भूमिपूजन असे जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात अशावेळी स्वतःचा मान-अपमान हे सगळे विसरुन जनतेच्या भल्यासाठी जायला पाहिजे, असा टोला सावंत यांनी लगावला. यामध्ये, कोणताही दुजाभाव अथवा पक्षीय राजकारण नसून राज्याच्या साडेबारा कोटी लोकांना आरोग्याची व्यवस्था मिळाली पाहिजे, यासाठी मी काम करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटल

error: Content is protected !!