सरकार आणि पुरातत्व विभाग दोघेही झोपेत तर शिवप्रेमी संतप्त – महाराजांच्या पन्हाळ्यावर दारू पार्टी
कोल्हापूर/ सरकार आणि पुरातन विभाग यांच्या वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले भग्नावस्थेत पडले आहेत त्यामुळे काही पर्यटक चक्क तेथे दारू पार्ट्या करून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करीत आहेत.पन्हाळगडावर अशीच एक दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली आहे
सिध्दी जोहरने पन्हाळ गडास टाकलेला वेढा आणि तेथून महाराजांनी यशस्वीरीत्या करून घेतलेली सुटका,या सुटकेच्या वेळी पावनखिंडीत झालेला रणसंग्राम या सगळ्या गोष्टींमुळे पन्हाळगड प्रसिद्ध आहे.शिवाय तो महाराजांचा आवडता किल्ला होता पण काळाच्या ओघात इतर गडकिल्ल्यांच्या प्रमाणेच या गडाची अवस्था झाली आहे पण तरीही मोठ्या प्रमाणात पन्हाळ गड पाहण्यासाठी पर्यटक येतात सध्या या किल्ल्याची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे आणि पर्यटकांची वाढती संख्या पाहून या ठिकाणी एक झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे दरम्यान याच झुणका भाकर केंद्रात दारूची पार्टी झाल्याचा एक व्हिडिओ प्रकाशित होताच शिवप्रेमीं मध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि ही दारू पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .दरम्यान महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांवर सध्या अशाच दारू पार्ट्या होत आहेत त्यामुळे हा सगळा प्रकार बंद व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे.