ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राजकारणाचे सत्ताकरण!


राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा भाजपच्या हिंदुत्वाला चिकटून राहण्याची भूमिका घेतली नाही.त्यांचं राजकारण सर्वव्यापी होते.म्हणूनच विरोधी पक्षांमध्ये सुधा त्यांच्या विषयी आदर आहे.भाजपच्या फडणवीस निती बद्दल गडकरी सारख्या निष्ठावंतांना राग आहे.कारण संघाची शिस्त आणि प्रामाणिक पणा फडणवीस आणि त्यांचे चेले चपाटे सोडून सर्वच निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नसानसात आहेत.आणि त्यांच्या समोर हेडगेवार गोळवलकर गुरुजी,वाजपेयी अडवाणी यांचा आदर्श आहे.अडवाणी वाजपेयींनी शून्यातून भाजपला नवी दिशा दिली आणि सत्तेपर्यंत पोचवले.पण फोडाफोडीचे राजकारण केले नाही कारण त्यांचा राजकारणा पेक्षा सजकरणावर अधिक विश्वास होता अडवणी,वाजपेयी यांच्या तालमीत तयार झालेल्या गडकरी सारख्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांनी केलेली खोगीर भरती अजिबात मान्य नाही कारण दुसऱ्या पक्षातले फुटीर हे दगाबाज असतात त्यांचा समाजकारण,नीतिमत्ता याच्याशी काडीचाही संबंध नसतो जिकडे सर्शी तिकडे त्यांची फरशी चालते आणि अशा लोकांच्या भरोषवर सत्तेत येणे mhanje भाजपच्या मूळ प्रामाणिक विचार पेनालिशी gaddari करण्यासारखे आहे ही भावना भाजपतील जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे.आणि म्हणूनच फडणवीसांनी सुरू केलेल्या फोडाफोडी chya राजकारणापासून ते दूर आहेत.आणि याच निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील खंत आणि खदखद गडकरींनी बोलून दाखवली आहे.आज फडणवीसांनी शिवसेना फोडून सरकार बनवले आहे ते टिकेल की नाही टिकेल हा नंतरचा भाग आहे पण आज शिवसेनेतील जे लोक फडणवीसांच्या सोबत आले आहेत.त्यांना शिवसेनेने आणि स2अर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ केलं होत ज्यांची रिक्षाचा टायर घेण्याची एपत नव्हती ते शिवसेनेत राहून अब्जाधीश झाले आणि शिवसेनेने त्यांना एवढं सगळ देऊनही त्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी गद्दारी केली.ज्यांनी वर्षं वर्ष शिवसेनेत राहून अफाट पैसा कमावला ते एका फटक्यात फालतू कारणे सांगून जर शिवसेना सोडू शकतात ते भाजप आणि फडणवीसांच्या सोबत कसे आणि किती दिवस प्रामाणिक राहू शकतील याची शंका भाजपतील निष्ठावंतांना आहे म्हणून ते या फुटिरंच्या वाऱ्याला सुधा थांबायला तयार नाहीत.पण फडणवीस यांना त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही केवळ मोदी आणि अमित शहा यांच्या नजरेत आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपला आपल्या मुठीत ठेवण्याचा त्यांचा आटापिटा आहे.त्यासाठी पक्षाच्या विश्वास अहेतेचा बळी गेला तरी चालेल दुसऱ्या पक्षातल्या फुतीरांच्या खांद्यावर आपली पालखी कशी शाबूत राहील याचाच विचार करून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे

error: Content is protected !!