ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

योगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत

मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी फिर्याद नोंदवली आहे . त्यामुळे राणेना थोडफार दिलासा मिळाला असला तरी उद्धव ठाकरे मात्र अडचणीत आले आहेत .
नारायण राणे यांना मुरुडच्या दंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला तर दुसरीकडे राणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन राणे यांच्यावर पुढील तारखेपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबर पर्यंत कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत . त्यानंतर काल राणेंनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप दाखवून परब यांच्या दबावामुळेच आपल्याला अटक झाल्याचे सांगितले. तसेच मी शिवसेनेला पुरून उरलोय त्यामुळे त्यांना अजिबात घबराट नाही असे सांगून तुम्हालाही मुल बाळ आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा दिला.तर शिवसेनेकडून सुधा राणेंना इशारे दिले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे.दरम्यान २०१८ मधील एका जाहीर सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना उद्वव ठाकरे .म्हणाले होते की योगीचे थोबाड फोडू त्यांच्या या भाषणाची एक क्लिप भाजपा कार्यकर्त्यांच्या हाती लागली असून या प्रकरणी यवतमाळ येथील पाच पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध लेखी फिर्याद दाखल करण्यात आल्याने आता उद्धव ठाकरे हे सुधा अडचणीत आले आहेत त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे .

बॉक्स/..तर राणेंचा कोथळा बाहेर काढू

/शिवसेना आमदार
राणे आणि शिवसेना यांच्यातील राडेबाजी खून खराबा करण्यावर आली असून शिवसेनेचे आमदार संतोष बंगर यांनी राणेंना धमकी देताना राणेंचा त्यांच्या घरात घुसून कोथळा काढू असा इशारा दिलाय तर दुसऱ्या एका नेत्याने राणे पुन्हा अस काही बोलले तर त्यांचे एन्काऊंटर करू असे म्हटले आहे .

error: Content is protected !!