ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ठाणे

महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ठामपाचा-सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा

ठाणे (25) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजहित लक्षात घेवून तसेच शासन व महापालिकेच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करुन यंदाही दीड दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी आज झालेल्या बैठकी दरम्यान नमूद केले.

     ठाणे महापालिकेच्यावतीने 39 वी श्री गणेश मंडळाची सर्वसाधारण सभा आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालन येथे पार पडली. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपआयुक्त मारुती खोडके, अशोक बुरपल्ले, मीनल पालांडे, नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगरअभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, आपत्ती विभागाचे व्यवस्थापक संतोष कदम, वृक्ष विशारद कृष्णकांत धावडे, मंडळाचे कार्यवाहक आर.के.पाटील,सचिव पी.एच पाटील, खजिनदार संजय माने, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठामपा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 या पदावर संदीप माळवी यांची नियुक्ती झाल्याने महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तर गेली 39 वर्षे अविरतपणे गणेशोत्सव मंडळाची सेवा केल्याबद्दल मंडळाचे कार्यवाहक आर.के.पाटील यांचा देखील महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील जागेमध्ये अत्यंत साधेपणाने श्री मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. कोरोना जरी आटोक्यात असला तरी अद्याप पूर्ण धोका टळलेला नाही, त्यामुळे यंदाही दीड दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार असून यंदा गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारची देणगी स्व‍िकारण्यात येणार नसल्याचे गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त तथा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. विपिन शर्मा ,उपाध्यक्ष अशोक बुरपल्ले यांच्या सुचनेनुसार श्री गणेशाचे विसर्जन महापालिकेच्या प्रांगणात कृत्रिमरित्या केलेल्या व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. तसेच ठाणेकर नागरिकांनी देखील यावर्षी सुध्दा श्री चे विसर्जन घरातच करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
error: Content is protected !!